आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाघोलीत ज्वेलरीचे दुकान फोडून दागिन्यांची चोरी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 17, 2024
Spread the love

पुणे : वाघोली परिसरातील तात्याश्री कॉम्प्लेक्स बिल्डींगमधील गणेश गोल्ड अॅण्ड इमिटेशन ज्वेलरी हे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाखाच्या दागिन्यांची चोरी केली आहे.

या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली आहे. दुकान कुलुप लावून बंद असताना कोणीतरी अज्ञात इसमाने दुकानाचे लोखंडी ग्रिलचे कुलूप तोडुन तसेच दुकानाचे लोखंडी शटर मध्य भागामधुन उचकटून त्यावाटे दुकानात प्रवेश केला. व २,९५,०००/- रु.कि.चे सोन्या-चांदिचे दागिणे व डीव्हीआर मशीन चोरी केली. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे करीत आहेत.