आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

जुन्या वादातून येरवड्यात तरुणाचा खुन

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 17, 2024
Spread the love

पुणे : जुन्या वादातून येरवड्यात तरुणाचा वार करून खुन करण्यात आल्याची घटना घडली आहे.

गोल्फ क्लब चौकाजवळ हॉटेल साईझायका परिसरात १७ जुलै रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री तिघांनी सुचिर चंद्रकांत गवस (वय २३ वर्षे, रा. जप्रकाशनयगर, येरवडा) याच्यावर लोखंडी हत्याराने डोक्यात व अंगावर वार केले. या प्रकरणी पोलीसांनी प्रवीण रामचंद्र आचार्य, स्वप्नील प्रवीण आचार्य, व रविकिरण रामचंद्र आचार्य (रा.जयप्रकाशनगर, येरवडा) यांना रात्री उशिरा अटक केली आहे. हा तपास सहायक पोलीस निरीक्षक विशाल टकले करीत आहेत.