आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कोंढव्यातील पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावणारा पोलीसांच्या जाळ्यात

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 18, 2024
Spread the love

पुणे : गेल्या काही दिवसात कोंढवा परिसरातील पादचाऱ्यांचे मोबाईल हिसकावणारा आरोपी अखेर पोलीसांच्या जाळ्यात अडकला आहे.दुचाकीवरून येत दोघा चोरट्यांनी परिसरात मोबाईल हिसकावत दहशत निर्माण केली होती. कोंढवा पोलीस त्यांच्या मागावर होते. अखेर या चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे.

दि ०८ जुन २०२४ रोजी रात्री ताहेरी क्लिनीक समोर, साळुंखे विहार रोड, कोंढवा खुर्द, येथे अल्पवयीन मुलगा टेलिफोन एक्स्चेंज समोर जेवण करून वॉकिंग करीत असताना एका दुचाकी वरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांचा वन प्लस कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावला होता. त्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालून आरोपीचा शोध घेवून त्यांना अटक करण्याबाबत कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, व पोलीस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने कोंढवा तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार निलेश देसाई यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा मोबाईल फोन हा उमर सलीम शेख, (रा. गल्ली नं.०१, पिताश्री आश्रम जवळ, शिवनेरीनगर, कोंढवा, पुणे) हा वापरत असल्याची माहिती प्राप्त केली.

त्यानंतर तपास पथकाचे पो. अंमलदार शाहिद शेख व लक्ष्मण होळकर, यांनी आरोपीचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले. आरोपीकडे केलेल्या तपासादरम्यान त्याने सदरचा गुन्हा हा त्याच्या अप्लवयीन साथीदारासह केल्याचे मान्य केले.

आरोपीकडून गुन्हा करताना वापरलेली ४०,०००/- रू. किं. ची एक होंडा शाईन दुचाकी तसेच ८६ हजार रू किंमतीचे १० मोबाईल फोन असा एकुण १ लाख २६ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त परि. ५, आर राजा, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग, गणेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंढवा पोलीस स्टेशन संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक, गुन्हे, रूणाल मुल्ला, पोलीस निरीक्षक, गुन्हे मानसिंग पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी डिगोळे, पोलीस अमंलदार निलेश देसाई, विशाल मेमाणे, सतिश चव्हाण, गोरखनाथ चिनके, लक्ष्मण होळकर, शाहीद शेख, संतोष बनसुडे, सुजित मदन, सागर भोसले, सुरज शुक्ला यांच्या पथकाने केली आहे.