आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लोकमत व सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स तर्फे यथोचित सन्मान; पुरस्कारार्थींच्या शिरपेचात मानाचा तुरा

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 19, 2024
Spread the love

पुणे : मानवाच्या प्रगतीचे टप्पे बघितले तर वेगवेगळ्या क्षेत्रांत नवनिर्मिती साधली आहे. याच नवनिर्मितीतून शेती, आरोग्य, उद्योग, व्यवसाय, आहार, शिक्षण, योगा, निसर्ग पर्यटन, पाणीबचत, औद्योगिक यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्क्रांती झाली. त्यामुळे जीवनाला एक उंधी मिळाली. आपल्या तल्लख बुद्धीच्या व अफाट कष्टाच्या जोरावर संशोधनाच्या माध्यमातून समाजाचे जगणे सुसह्य करण्यांचा प्रयत्न करणाऱ्या विविध क्षेत्रांत विकासाची गरुडझेप घेणाऱ्या मान्यवरांचा ‘सूर्यदत्त एक्सलन्स अवॉर्ड २०२४’ देऊन गौरविण्यात आले.

लोकमत व सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने हॉटेल सयाजी येथे आयोजित कार्यक्रमात ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांच्या हस्ते प्रारंभी लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन करून सन्मान सोहळा प्रारंभ झाला . लोकमत चे उपाध्यक्ष बी बी चांडक, लोकमत चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी, सूर्यदत्तचे संचालक ओ डी व सी एस आर प्रा . प्रशांत पितालिया, फॅशन टेकनॉलॉजि च्या उप प्राचार्य प्रा. रेणुका घोसपूरकर, प्रा पूजा विश्वकर्मा आदी उपस्थित होते.

लोकमत चे उपाध्यक्ष बी बी चांडक यांनी प्रास्ताविक केले तर लोकमत चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले , पुरस्कारार्थींच्या वतीने पीयूष सोमानी, कल्याणी शिंदे, डॉ. प्रमोद शिंदे, मनीष कोठारी यांनी मनोगत व्यक्त केले. कर्मभूमीत मिळालेल्या या पुरस्काराने आम्ही धन्य झालो आहोत. आमच्या पाठीवर सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटसने दिलेली कौतुकाची थाप प्रेरणादायी आहे. येणाऱ्या पिढीसाठी निश्चितच ती उपयोगी ठरेल.

आज आमच्या सर्व सन्मानार्थीना ‘सायंटीट्स’ ही पदवी देऊन आमच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असल्याचे गौरवोद्गार सन्मानार्थीनी काढले. पियू आरोळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा प्रशांत पितालिया यांनी आभार मानले. प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् मध्ये आम्ही जास्तीत जास्त रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर भर देतो. ज्यांना आज आम्ही पुरस्कार दिले, ते सर्वजण खरोखरच त्या-त्या क्षेत्रातील मान्यवर आहेत. त्यांच्यामुळे आज पुरस्काराचे नावही मोठे मोठे झाले आहे.

कोणी शेती क्षेत्रात, संशोधनात तर कोणी योगामध्ये केलेले काम हे येणाऱ्या नवीन पिढीसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. त्यांच्या कार्याला आमच्याकडून सलाम करतो. आम्ही विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करत आहोत.” सुषमा चोरडिया म्हणाल्या, “नाशिकच्या विविध क्षेत्रात संशोध नाबरोबरच विकासासाठी झटणाऱ्या मान्यवरांचा सूर्यदत्त इन्स्टिट्यूटस् तर्फे करण्यात आलेला सन्मान माणजे आम्ही आमचे भाग्य समजतो. संसोधन आणि विकासाला आजच्या जगात खूप महत्त्व आहे.

सत्कारार्थी सर्वांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. आजची शिक्षणव्यवस्था आपल्याला तयार करते; पण अधिक प्रगती गाठायची असेल तर व्यवसायाकडे कल हवा. आजचा युवक भरकटला जातोय, त्याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण हाच युवक उद्याचे भविष्य आहे.” पुरस्कारार्थीमध्ये राजेंद्र ब्रह्मेचा, मनीष कोठारी, किशोर लक्ष्मीनारायण राठी, सतीश मनियार,कपिल सुराणा, डॉ. पल्लवी कासलीवाल देशपांडे, नरेंद्र गोलिया ओमप्रकाश कुलकर्णी, डॉ. प्रमोद शिंदे, विनायक गोविलकर, अविनाश सिरोडे, अरुण काबरे, अपूर्वा जाखडी, नरेंद्र गोलिया, अभय कुलकर्णी, संजय पवार, डॉ. रणजित जोशी, पीयूष सोमानी, सुजाता बाबर, डॉ. ऋतिका रमेश नाईक, शेखर गायकवाड, अनिरुद्ध अथनी, प्रज्ञा पाटील, अभिजित महाले, बाळासाहेब शंकर मराळे, लक्ष्मी मधुकर मोरे, अर्शद मुख्तार, रामदास सानप, कल्याणी शिंदे, विनायक रानडे, अजित खर्जुल, मनोज कोटकर, अदिश्री पगार, विनोदिनी काळगी यांचा समावेश आहे.

सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटस् विषयी बोलताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे २३ हुन अधिक मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांचा एक शैक्षणिक समूह असून, ज्यामध्ये केजी ते १२ वीपर्यंत शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, पदवी ते पदव्युत्तर अभ्यासक्रम देणाऱ्या उच्चशिक्षण संस्था, संशोधन केंद्रे, प्रशिक्षण, संशोधन, इनोव्हेशन केंद्रे इत्यादींचा समावेश आहे. सूर्यदत्तच्या सल्लागार आणि गव्हर्निंग कौन्सिलमध्ये प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ, व्यावसायिक, उद्योगपती, आंतरराष्ट्रीय सल्लागार आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश आहे.

“अमेरिकेतील ग्लोबल चेंबर या जागतिक स्तरावरील संस्थेच्या चेअर ऑफ द युनिव्हसिटी इंडस्ट्री, पार्टनरशिप प्रोग्राम पदावर नियुक्त झालेले ‘सूर्यदत्त’चे प्रा.डॉ संजय बी. चोरडिया हे भारतातील पहिले व्यक्ती आहेत. त्यांचा प्रदीर्घ अनुभव, सखोल ज्ञान आणि समाजाभिमुख काम करण्याची वृत्ती, २० वर्षांहून अधिक आयोग क्षेत्राचा तर २५ वर्षांहून अधिक शिक्षण क्षेत्राचा अनुभव त्यांना आहे.

नावीन्यपूर्ण, धोरणात्मक आणि कल्पक, कौशल्याधारित शिक्षण पद्धतीला प्राधान्य देत विद्यार्थी शिक्षणाच्या केंद्रस्थानी ठेवून स्थापन केलेले केजी टू पीजी शिक्षण देणारी नामवंत शिक्षण संस्था, १०० हुन अधिक विविध चेंबर ऑफ कॉमर्स चे सदस्य, दूरसंचार व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, टेलिफोन अॅडव्हायझरी कमिटी सदस्य, उद्योग मंत्रालयाच्या औद्योगिक विकास विभागाचे सदस्य म्हणून त्यांनी काम पहिले आहे . त्यांचे २०० हुन अधिक पेटेंट प्रकाशित असून, दोन महत्वपूर्ण संशोधन त्यांनी केले आहे. त्यांच्या कार्याबद्दल आजवर त्यांना १०० हुन अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे,” असे सुषमा चोरडिया यांनी नमूद केले.