आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भरधाव ट्रकच्या धडकेने तरुण ठार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 19, 2024
Spread the love

पुणे : पुणे- नगर रोडवर बकोरी फाटा वाघोली येथे भरधाव ट्रकच्या धडकेने तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तरुणास जोरदार धडक बसली. या प्रकरणी पोलीस अंमलदार उमेश साबळे यांनी फिर्याद दिली आहे.

चालक केशव भगवानराव निर्वळ (वय २३ वर्ष रा. वाडेगाव कोरेगाव भिमा ता. शिरुर) याच्यावर हयगयीने वाहन चालवून तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलीसांनी तातडीने धाव घेत वाहतूक सुरळीत केली.