आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सदनीकेतून १० लाखाच्या दागिन्यांची चोरी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 19, 2024
Spread the love

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील सोसायटीतील सद्निकेतून भरदिवसा दहा लाखाचे दागिने चोरीस गेले आहेत.

या प्रकरणी ५३ ए, रागविलास सोसायटी लेन-सी कोरेगाव पार्क, पुणे येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. १७ जुलै रोजी फिर्यादी हे कामावर गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने फिर्यादी यांचे घराची कडी उघडुन बेडरुममध्ये प्रवेश केला व लाकडी कपाटात ठेवलेले १०,९५,०००/रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. ते घरी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघड्कीस आला व त्यांनी तातडीने पोलीसात तक्रार दिली आहे.