आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

प्रीपेड टास्कच्या नावाने ५ लाखाची फसवणूक

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 19, 2024
Spread the love

पुणे : प्रीपेड टास्कच्या नावाने नफ्याचे आमिष दाखवून एका महिलेची ५ लाखाची फसवणूक केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली आहे.

या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांना वर्क फ्रॉम होमच्या नावाने व्हिडीओ लाईक्सचे टास्क देण्यात आले.

सुरूवातीस २६,६००/- रूपये फिर्यादी यांच्या बैंक खात्यावर जमा करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करण्यात आला. फिर्यादी यांना अधिक कमिशन मिळण्याचे खोटे आमिष दाखून प्रीपेड टास्कच्या नावाने फिर्यादी यांना बैंक खात्यावर पैसे पाठविण्यास भाग पाडुन फिर्यादी यांची एकूण ५,००,०००/- रूपयांची आर्थिक फसवणुक केली आहे. हा तपास पलीस निरीक्षक (गुन्हे) सर्जेराव कुंभार करीत आहेत.