आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

भवानी पेठेत साडेतीन लाखाची घरफोडी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 20, 2024
Spread the love

पुणे : भवानी पेठेतील पूना कॉलेज समोर असलेल्या घरातून चोरट्यांनी रोख रक्कम, व साडेतीन लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने असा ऐवज लंपास केला आहे. खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीची घटना १३ ते १६ जुलै या कालावधीत घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी कोंढवा येथे राहणाऱ्या एका ८० वर्षीय वृद्धाने तक्रार दिली आहे. भवानी पेठेत पूना कॉलेज समोर असलेल्या कल्पना अपार्टमेंट मधील फ्लॅट नंबर ११३ मध्ये ही चोरी झाली आहे.

चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिन्यांची चोरी केली आहे. हा तपास पोलीस उप निरीक्षकअभिजित पवार करीत आहेत.