आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कैद्यांसाठी सकारात्मक जीवनाचे व्याख्यान

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 23, 2024
Spread the love

पुणे : उमा गोपाळे विश्वनाथन, सुदीक्षा फाऊंडेशन यांच्या वतीने येरवडा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी ‘मनाची अमर्याद शक्ती व ताणतणाव’ या विषयावर आधारीत डॉ. दत्ता कोहिनकर यांचे व्याख्यान दि.२१ जुलै रोजी आयोजित करण्यात आले होते.

कारागृहातील चार भिंतीच्या आत कैद्यांच्या मनात जीवन जगण्याबद्दल सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने तसेच मनाच्या मुलभुत सत्याला सोप्या भाषेत समजण्यासाठी, मानसिक व शारिरीक बंधनातून मुक्त करण्यासाठी हा उपक्रम सर्वार्थाने यशस्वी होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

उपक्रम विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या संकल्पनेतून उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग (कारागृह) स्वाती साठे, यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी अधीक्षक, येरवडा मध्यवती (कारागृह,) सुनिल एन ढमाळ, डॉ. भाईदास ढोले, उपअधीक्षक, पी पी कदम, उपअधीक्षक, ए. एस. कांदे वरीष्ठ तुरुंगाधिकारी, शेरखान पठाण, तुरुंगाधिकारी श्रेणी-०२, सतिश कदम, सुभेदार तसेच सुदीक्षा फाऊंडेशनच्या उमा गोपाळे व इतर सहकारी यांनी कामकाज पाहीले. कार्यक्रमास चित्रपट दिग्दर्शक रामकुमार शेडगे आणि डॉ. महेंद्र घागरे पर्यावरण मित्र उपस्थित होते.