आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

डेक्कनमधील बंगल्यातून दागिन्यांची चोरी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 24, 2024
Spread the love

पुणे : डेक्कन परीसरातील एका बंगल्यातून चोरट्यांनी सव्वातीन लाखाचे दागिने व एक दुचाकी चोरून नेली आहे.

या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. प्रभात रोड वरील एका चाळीस वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री बंगला, गल्ली न. १५, प्रभात रोड, पुणे येथे ही चोरीची घटना दि.२० जुलै रोजी पहाटे घडली आहे.

अज्ञात इसमाने घराच्या किचनच्या खिडकीतुन प्रवेश करुन घरातील ३,३०,०००/- रू किं. चे दागिने व एक मोटार सायकल असा ऐवज चोरी करून नेला आहे. शहराच्या मध्यवस्तीत चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे.