जखमी व अडचणीत सापडलेल्या प्राण्यांचा जीव वाचणार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
बार्शी : लिओ क्लब बार्शी टाऊन तर्फे पाळीव व वन्यजीव बचावासाठी ट्रॅप पिंजरे प्राणीसेवक फाउंडेशन बार्शी यांना भेट देण्यात आले.
लिओ क्लब बार्शी टाऊन तर्फे नेहमी प्रमाणे एक वेगळा प्रकल्प तयार करण्यात आला. जखमी व अडचणीत सापडलेल्या प्राण्यांचा जीव वाचवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी सर्व क्लबच्या सदस्यांची इच्छा होती.
पाण्याच्या शोधात पाळीव व वन्यजीव अनेक वेळेस विहिरीत किंवा पाण्याच्या ओढ्यामध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळतात. किंवा अपघात होऊन जखमी अवस्थेत आढळतात. अशावेळेस प्राण्यांचा उपचार करणं कठीण असत. ह्या सर्व अडचणींवर तोडगा काडण्यासाठी लिओ क्लब बार्शी टाऊन तर्फे प्राण्यांच्या बचावासाठी ट्रॅप पिंजरे तयार करण्यात आले.
या पिंजऱ्यात मांजर, कुत्रा, शेळी तसेच उदमांजर,कोल्हा, हरीण, बिबट्या अदि असे वन्यजीवआंचा बचाव करण्याची सोय आहे. सर्व पिंजरे प्राणीसेवक फाउंडेशनचे ललित उर्फे काली वस्ताद बार्शी यांना सुपूर्त करण्यात आले आहेत.
लिओ क्लबचे अध्यक्ष गौरव देडिया, सचिव आवेश बंबोली, खजिनदार उदयन सावंत, प्रकल्प प्रमुख आदित्य सोनिग्रा, लिओ लायझन पवन श्रीश्रीमाळ, यश मेहता, शुभम बाफना, यश कुंकुलोल, रोनक कुंकुलोळ, मीत परमार, सिध्दार्थ कोटेचा उपस्थित होते. लिओ क्लबचे ॲडव्हायझर लायन प्रकाश फुरडे, प्राणीसेवक फाऊंडेशन चे काली वस्ताद, अजित जळगावकर, सम्मेद येवणकर, अथर्व रसाळ, अथर्व मंजूगडे, सोहम गुळवे उपस्थित होते.
