आवृत्ती पुणे
← Back to Homepage

जन्मदाता, गुरू आणि धर्म यांचे उपकार विसरू नका : प.पू. गौतममुनीजी म.सा.

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • July 30, 2024
Spread the love

पुणे : जन्म देणारा जन्म दाता, गुरू आणि धर्म यांचे उपकार कधी विसरता कामा नये. सद्‌मार्गावर नेणारे त्याग, तपस्या, जप यातून शिष्यांना निर्माण करणारे गुरू असतात. असे प्रतिपादन महाराष्ट्र गौरव प.पू. गौतममुनीजी म.सा. व प.पू. चेतनमुनीजी म.सा. यांनी केले.

महावीर प्रतिष्ठान, सॅलिसबरी पार्क येथे श्री वर्धमान श्वे. स्था. जैन श्रावक संघ, साधना सदन या संघात महाराष्ट्र गौरव प.पू. गौतममुनीजी म.सा. व प.पू. चेतनमुनीजी म.सा. यांचा चातुर्मास धर्मआराधना उत्तमप्रकारे प्रारंभ झाला आहे. गुरुपोर्णिमेनिमित्त आयोजित प्रवचनात त्यांनी सांगीतले की अंधकारातुन प्रकाशाकडे मिथ्यात्व कडून सम्यकतत्वा कडे घेऊन जाणारा एकच गुरू असतो.

जन्म देणारा जन्म दाता, गुरू आणि धर्म यांचे उपकार कधी विसरता कामा नये. ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत त्यांना कधी विसरू नये. सद्‌मार्गावर नेणारे त्याग, तपस्या, जप यातून शिष्यांना निर्माण करणारे गुरू असतात. गुरु चरणी श्रध्दा, विश्वास व समर्पण भावना जो शिष्य ठेवेल त्यांना ते गुरू सद्‌मार्गाला घेऊन जातात.

गुरुपोर्णिमेचे अवचित्य साधून साधना सदन संघाने विराजीत गुरूजनांना वंदन, नमन, सन्मान करून विजयकांत कोठारी व सज्जनबाई बोथरा या दोन गुरूवर्याचा संघाने सत्कार केला.
या वेळी संघातील सर्व प्रमुख वालचंद संचेती, विजय भंडारी, लखिचंद खिंवसरा, रायचंद कुंकुलोळ, बाळासाहेब धोका, अनिल नहार, पोपटलाल ओस्तवाल, पनालाल लुणावत, फुलचंद बाठिया, कुंदनमल दर्डा, अरुण शिंगवी, विजय धोका, विजय भटेवरा व समाजातील शेकडो श्रावक, श्राविका उपस्थित होते.

युवकांनी धर्माशी, समाजाशी जोडावे या करीता शनिवार दि २७ रोजी रात्री विख्यात बिजनेस गुरू मनिष गुप्ता यांचे व्याख्यान आयोजित केले होते. त्यावेळी समाजातील युवक युवती मोठ्या संखेने उपस्थित होत्या.

सुरूवातीला गुरूदेव प. पु. श्री गौतममुनीजी म. सा. त्यांनी आपल्या प्रवचनात असे सांगीतले की, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जाताना चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवले पाहिजे. आलेला ग्राहक हा आपली प्रसन्न मुद्रा पाहून आपल्या कडे आकर्षित होईल त्यावेळी आपण आपले बोलने मृदु आवाजात गोड असावे.

म्हणजे समोरील ग्राहक आपल्याला चांगला प्रतिसाद देईल. यामुळे आपला धंदा नक्कीच व्यवस्थित चालेल.हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता राजश्री पारख, विजय भंडारी, अनिल लुंकड, अमोल कुचेरीया, पंकज, कर्नावट, पवन भंडारी, प्रीतेश सुराणा, आंनद कुवाड, हेमंत रायसोनी, मनोज धोका यांनी विशेष परिश्रम घेतले. अशी माहिती साधना सदन श्री संघाचे सेक्रेटरी आदेश खिंवसरा यांनी दिली.