आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

रमणलाल लुंकड यांना उद्योग भूषण पुरस्कार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 8, 2024
Spread the love

पुणे : पुण्यातील अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टच्या वतीने सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी रमणलाल लुंकड यांना उद्योग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

लुंकड यांनी नाशिक येथील सामनगाव येथे मातोश्री वृद्धाश्रमातील एका इमारतीचे स्वखर्चाने बांधकाम केले आहे. मन आणि घर हरविलेल्या मनोरुग्णांसाठी कार्य करणाऱ्या अहमदनगर येथील अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाला स्वखर्चाने एक इमारत बांधून दिली.

लुंकड यांना जैन समाजाचा प्रतिष्ठित भामाशा पुरस्कार, समाजरत्न, चिंतामणी ज्ञानपीठाचा गुरुजन गौरव पुरस्कार, रोटरी क्लबचा सर्व्हिस एक्सलन्स पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेत. या कार्यासाठी त्यांना म्हसोबा ट्रस्टने दिलेला हा पुरस्काराच्या रुपाने त्यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

गणेश कला क्रीडा मंदिर पुणे येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, प्रख्यात तबला वादक पद्मश्री पं. सुरेश तळवळकर, पद्मश्री पं. विजय घाटे, पंडित शौनक अभिषेकी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, सुरेखा कुडची, म्हसोबा ट्रस्टचे अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, विश्वस्त निवृत्ती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.