आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुरस्काराने सामाजिक कामासाठी प्रेरणा मिळते व अधिक जबाबदारी वाढते

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 17, 2024
Spread the love

पुणे ; राष्ट्रसंत आचार्य भगवंत प.पू. आनंदऋषीजी म. सा. यांच्या १२४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी मुरलीधर मोहोळ बोलत होते.

महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा ‘आनंद दरबार पुणे’च्या वतीने पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना लोकमत चे संपादक संजय आवटे म्हणाले बुद्ध आणि महावीर त्या काळातील खरे क्रांतिकारक होते.

जैन धर्माच्या शिकवणीकडे सर्वांनी वळले पाहिजे, भारत एकमेव असा देश आहे की, सर्वांना आपले विचार मांडता येतात. महावीर आणि बुद्ध यांचे विचार सध्याच्या पिढीला त्यांच्या भाषेत शिकवले पहिजेत. यावेळी व्यासपीठावर जितोचे श्रमण आरोग्यमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय भंडारी, उद्योजक अनिलकुमार कांकरिया, विजयकांत कोठारी, पोपटलाल ओस्तवाल, रमणलाल लुंकड उपस्थित होते.

पुरस्काराचे मानकरी जैनरत्न पुरस्कार बाळासाहेब ओसवाल, युवा रत्न पुरस्कार महेंद्र सुंदेचा मुथ्था, गुरू आनंद कार्यक्षम पत्रकार संतोष गाजरे, पत्रकार हर्षद कटारिया यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रधान करण्यात आले.

मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. उपस्थितांचे स्वागत आनंद दरबारचे अध्यक्ष बाळासाहेब धोका यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुरस्कार समितीचे वडगाव धायरी संघाचे अध्यक्ष प्रकाश बोरा, दिलीप संचेती, उमेदमल धोका, परेश लोढा, पंकज बाफना, सुनील चोरडिया, सौरभ धोका, सुनील बुरड, कौशभ धोका यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश लुंकड यांनी केले. या कार्यक्रमाला उद्योगपती राजेश सांकला, अभय संचेती, ललित जैन, पुण्यनगरीचे संपादक श्रीकांत साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.