आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पीमपीतील प्रवासी महिलेच्या दागिन्यांची चोरी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • August 29, 2024
Spread the love

पुणे : मांगडेवाडी ते दांडेकर पूल दरम्यान प्रवास करत असताना पीएमपीएमएल बसमधील प्रवासी महिलेच्या दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे.

मांगडेवाडीतील एका २४ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्या २७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास बसने प्रवास करत होत्या.

मांगडेवाडी बस स्टॉपपासून ते दांडेकर पूल बस स्टॉप दरम्यान, बसमधील गर्दीचा फायदा घेत, अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधून १,४८,०००/- रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून नेले.

हा तपास महिला पोलीस उपनिरिक्षक तेजस्विनी पवार करीत आहेत.