आवृत्ती पुणे
← Back to Homepage

नवीपेठ परिसरात चंदनाचे झाड कापून चोरी

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • September 4, 2024
Spread the love

पुणे : नवी पेठ परिसरातील प्रशांतनगर येथील एका सोसायटीमधील बंगल्याच्या आवारातील चंदनाचे झाड कापून चोरी करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३१ ऑगस्ट रोजी उघडकीस आली आहे.

आसरा बंगल्यातील प्रशांतनगर, एलआयसी कॉलनी, एलबीएस रोड, नवी पेठ येथे फिर्यादी यांच्या घराच्या अंगणातील चंदनाचे झाड, ज्याची किंमत १०,०००/- रुपये आहे, ते कोणीतरी कापून चोरी केले आहे.

या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार निर्मला पडघमकर करीत आहेत.