आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चोरी गेलेले पाच लाखांचे ५१ मोबाईल हस्तगत करण्यात यश

maharashtra jain warta • Maharashtra News Networks • October 2, 2024
Spread the love

पुणे : चोरीस गेलेले अंदाजे ५ लाख किंमतीचे ५१ मोबाईल बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या सायबर पोलीस पथकाद्वारे हस्तगत करण्यात यश आले आहे.

बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅंड, ससून हॉस्पिटल, पी.एम.टी. स्थानक व इतर गर्दीच्या ठिकाणांहून मोबाईल फोन हे दिवसा किंवा रात्रीच्या अंधारात चोरीस गेले होते किंवा गहाळ झाले होते.

केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाद्वारे हरवलेले/चोरीस गेलेले मोबाईल शोधण्यासाठी CEIR (Central Equipment Identity Register) या ऑनलाइन वेबसाईटवर तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

त्या तक्रारींच्या अनुषंगाने अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर यांच्या आदेशानुसार बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या सायबर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ, पोलीस नाईक विष्णू सरवदे, पोलीस अंमलदार सागर घोरपडे, व अंमलदार निलेश पालवे यांनी सर्व मोबाईलचा शोध घेतला.

गहाळ झालेले मोबाईल फोन आयएमईआय नंबरवरून, एसडीआर तसेच लोकेशन वापरून शोध घेऊन, गहाळ मोबाईल पैकी अंदाजे ५ लाख किंमतीचे एकूण ५१ मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.

ही कामगिरी बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड, पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर गर्कळ, अंमलदार विष्णू सरवदे, सागर घोरपडे, निलेश पालवे, शशांक खाडे, प्रसाद पवार, ज्ञानेश्वर गायकवाड, विशाल जाधव यांनी केली.