आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पोलीस भरती परीक्षेला बसणाऱ्या दोन तोतया परीक्षार्थी जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • October 7, 2021
Spread the love

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स, आंबेगाव बुद्रुकमधील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पोलीस भरती परीक्षेसाठीचे हॉल तिकीट, पॅनकार्ड व फोटो असे कागदपत्र दाखवत बसण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जेरबंद केले. ही घटना सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स, आंबेगाव बुद्रुक येथे घडली.

बाबासाहेब भीमराव गवळी (वय २२), सूरज केसर सिंग भोपळावत (वय २७, रा. सांजखेडा, अडूळ, ता. पैठण, जि. औरंगाबाद) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मगन घाटुळे (वय ३८, रा. आंबेगाव बु।।, पुणे) यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी बाबासाहेब गवळी याने सूरज भोपळावत व पोलीस भरतीतील इतर मूळ उमेदवार यांच्याशी संगनमत करून, मूळ उमेदवार याचे नावाचे हॉल तिकीट, पॅनकार्ड व फोटो असे कागदपत्र स्वतःकडे घेऊन स्वतःच उमेदवार असे ठणकावून सांगत फसवणूक केली.

तसेच राज्य पोलीस भरती प्रक्रिया २०१९च्या लेखी परीक्षेसाठी आंबेगाव बुद्रुक येथे पोलीस भरतीचे लेखी परीक्षा केंद्रावर तोतया उमेदवार बसण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे करीत आहेत.