आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

श्रद्धास्थळाच्या विध्वंसाविरोधात जैन समाजाचा एल्गार

maharashtra jain warta • Maharashtra Jain Warta • April 23, 2025
Spread the love

जैन समाजातील चारही प्रमुख संप्रदाय दिगंबर, श्वेतांबर स्थानकवासी, मूर्तिपूजक आणि तेरापंथी यांनी एकत्र येत या आंदोलनात सहभाग घेतला, हे या आंदोलनाचे विशेष वैशिष्ट्य ठरले. विद्यार्थी, युवक, महिला यांचा मोठा सहभाग होता. सुमारे दोन तास चाललेल्या आंदोलनात प्रशासन परिसर व बीएमसीविरोधी घोषणांनी दणाणून गेला होता.

धार्मिक स्थळांवर घाव घालणे कोणत्याही सरकारला शोभणारे नाही. जैन समाजाने या आंदोलनातून सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे.धार्मिक स्थळांचा अवमान सहन केला जाणार नाही.” यावेळी आंदोलनकर्त्यांनी आपली मागणी निवेदनाद्वारे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्याकडे सादर केली. मंदिर पाडणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आंदोलनकर्त्यांची ठाम मागणी होती.

या आंदोलनात अचल जैन, मिलिंद फडे, विजयकांत कोठारी, अभय छाजेड, प्रविण चोरबेले, अनिल भन्साळी, बाळासाहेब ओसवाल, लक्ष्मीकांत खाबीया, युवराज शहा, भरत सुराणा, नितीन जैन, अक्षय जैन, इंद्रकुमार छाजेड, देवीचंद जैन, राजेश शहा, अभय संचेती, संतोष जैन, सतीश शहा, पोपटलाल ओस्तवाल, चंद्रकात लुंकड, माणीक दुगड, बाळासाहेब धोका, राहुल संचेती, अमोल कुचेरिया, पराग दोशी, अनिल नहार, विजय नवलाखा, अशोककुमार पगारिया, महावीर कटारिया, पुष्पा कटारिया, सोनिका शहा, खुशाली चोरडिया, संदीप भंडारी, अभिजीत शहा, मयूर सरनोत, देवेंद्र पारख, नितीन जैन, अरुण कटारीया, प्रवीण (पोपट) ओसवाल, मनीष जैन, राजेंद्र बांठिया, मयूर कोठारी, राजकुमार गांधी, बाळासाहेब कटारिया, नकुल संघवी, यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी होते.

“ज्यांच्या श्रद्धास्थानांवर हात उचलला जातो, त्यांच्या भावना दुखावल्या जातात.मंदिर पाडणे हा केवळ धार्मिक नव्हे, तर मानवी संवेदनांचा अवमान आहे. आम्ही शांततेच्या मार्गाने पण ठामपणे लढा देणार आहोत.” – अचल जैन, सकल जैन संघाचे प्रमुख

“जैन समाज शांतताप्रिय आहे. आम्ही रस्त्यावर येणे दुर्मीळ असते. परंतु ही घटना केवळ मुंबईपुरती मर्यादित नाही. पालीताना (गुजरात), सम्मेद शिखरजी आणि इतर काही ठिकाणीही अशा घटना घडल्या आहेत. मी स्वतः २५ वर्षे नगरसेवक होतो, त्यामुळे प्रशासनाची कार्यपद्धती मला ज्ञात आहे. ही अतिशय गंभीर बाब असून शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.” – अॅड. अभय छाजेड, मा. नगरसेवक

“मुंबईतील मंदिरातील दुर्दैवी घटनेने मन अस्वस्थ केलं. या घटनेबद्दल मनातील भावना मी शब्दबद्ध केल्या आहेत. – अभय संचेती

“आज जैन समाज रस्त्यावर उतरला आहे, ही बाब प्रशासनासाठी आत्मपरीक्षणाची आहे. धार्मिक स्थळांवर घाव घालणे कोणत्याही सरकारला शोभणारे नाही. जैन समाजाने या आंदोलनातून सरकारला स्पष्ट संदेश दिला आहे – धार्मिक स्थळांचा अवमान सहन केला जाणार नाही.” – मिलिंद फडे