• महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
Thursday, April 23, 2026
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

बॉडी बनवण्याच्या इंजेक्शनची बेकायदेशीर विक्री करणारे जेरबंद

November 30, 2023
0
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल : २११ इंजेक्शन, औषधे व स्वीफ्ट कार जप्त

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शरीरयष्टी वाढविण्याकरिता डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन द्वारेच विक्री करणे बंधनकारक असलेले मेफनटेरमाईन सल्फेट इंजेक्शन अवैधरित्या जवळ बाळगून त्याची बेकायदेशीरपणे विक्री करणाऱ्या चौघांना बिबवेवाडी पोलीसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २११ इजेक्शन, औषधाचे बॉटल्स, एक स्विफ्ट कार असा एकूण दोन लाख सहा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-५च्या पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांनी दिली आहे.

याप्रकरणी परेश निवृत्ती रेणुसे (वय-३३, रा. धनकवडी, पुणे), प्रविणसिंग पुकसिंग भाटी (२३, रा. शिवणे, पुणे), अक्षय संभाजी वांजळे (२६, रा. वारजे, पुणे) व शैनक प्रकाश संकपाळ (२८, रा. बहिरटवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या चौघांची नावे आहेत.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण काळुखे, पोलीस उपनिरीक्षक संजय आदलिंग गस्त घालत होते. त्यावेळी एक इसम डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन शिवाय शरीरयष्टी वाढविण्याकरिता इंजेक्शनची विक्री करण्यासाठी बिबवेवाडी येथील डॉल्फीन चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेत इंजेक्शनचे सहा बॉटल हस्तगत, जप्त करीत अधिक तपास करुन त्याचा साथीदाराकडून तसेच त्यांचे घरझडती घेऊन २११ बॉटल्स व एक कार मिळून आली. याबाबत अन्न औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक अतिश सरकाळे यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहे.

19 10 2021 News new
Download

Latest Articles

व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

व्यावसायिकाच्या कार्यालयातून दहा लाखांची रोकड चोरी

April 23, 2026
सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

सोसायटीतील घसरगुंडी पडून बालिकेचा मृत्यू

April 23, 2026
नदीपात्रात तरुणाचा खून आर्थिक वादातून

नदीपात्रात तरुणाचा खून आर्थिक वादातून

April 23, 2026
इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

इस्त्रो शास्त्रज्ञ असल्याची बतावणी करून महिलेची फसवणूक करणारा अटकेत

April 23, 2026
सुरक्षारक्षकाला धमकावून ४० हजारांची रोकड लुटली

दहशत माजविणारा तडीपार गुंड गजाआड

April 22, 2026
Load More
Previous Post

दसऱ्याच्या दिवशी आईचा खून करणारा मद्यपि मुलगा जेरबंद

Next Post

लोहमार्ग पोलिसांच्या लेखी परीक्षेतील कॉपीबहाद्दराला जेलची हवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT USAddress :

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

© 2024 Maharashtra Jain Warta