• About
  • Terms and Conditions
  • Privacy & Policy
  • Contact
Tuesday, June 17, 2025
Maharashtra News Network
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता
No Result
View All Result
Maharashtra News Network
No Result
View All Result
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क
  • महाराष्ट्र जैन वार्ता

मित्राचाच खून करणाऱ्या सराईताला अटक

November 30, 2023
0
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Spread the love

दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : तीन अल्पवयीन साथीदार ताब्यात

महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क

पुणे : मित्राचाच खून करणाऱ्या सराईताला अटक करण्यात दत्तवाडी पोलिसांना यश मिळाले असून आरोपीच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दत्तवाडी पोलीस ठाण्यातील नोंदीनुसार, मंदार सुनील जोगदंड ( वय २३, रा. आंबिलओढा पुणे) याचा दि. १९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास सई हेरिटेज सोसायटी, सिंहगड रोड, पुणे समोरील मंदिरासमोर खून झाला होता. खुनामधील आरोपींचा दत्तवाडी पोलीस स्टेशनकडील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी वरिष्ठांच्या सूचनांनुसार तपास करत असताना पोलीस हवालदार कुंदन शिंदे, पोलीस अंमलदार शिवाजी क्षीरसागर, दयानंद तेलंगे पाटील यांना त्यांच्या खास बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, “सदरचा गुन्हा केलेले आरोपी हे निलायम पुलाखालील ओढ्याच्या लगत त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी येणार असून तेथून ते सोलापूर भागात पळून जाणार आहेत.”

अशी बातमी मिळाल्यानंतर तपासपथक अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने हालचाल करत आपआपसांत पथके स्थापन करत सदर ठिकाणी पळून जाणाऱ्या आरोपींना सापळा रचून पकडले असून,त्यापैकी साहिल भरत इजगद रा. स. नं. १२२, सावित्रीबाई फुले वसाहत, पु. ल. देशपांडे उदयानाशेजारी, सिंहगड रोड पुणे. या दत्तवाडी पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील सराईतास अटक केले असून त्याच्यासोबत पळून जाण्याच्या तयारीत असणाऱ्या दोन अल्पवयीन साथीदारांना १९ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच २० ऑक्टोबर रोजी सदर गुन्ह्यातील त्यांचा मुख्य अल्पवयीन सूत्रधार यास दत्तवाडी पोलिसांनी हनुमाननगर, दत्तवाडी भागातील ओढ्यामध्ये लपून बसलेला असताना त्यास ताब्यात घेतले आहे.

सदर खून प्रकरणांतील आरोपी व मयत हे एकमेकांचे मित्र असून ते एकत्र दारू पिताना झालेल्या किरकोळ वादविवादातून अटक आरोपी व त्याचे अल्पवयीन साथीदार यांनी मंदार सुनील जोगदंड याचा निर्घृण खून केल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात निष्पन्न झाले असून, सदर प्रकरणामध्ये त्यांना कोणी मदत केली काय? किंवा अजून त्यात कोणाचा हात आहे काय? याबाबत दत्तवाडी पोलीस सखोल तपास करीत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक युवराज पाटील, दत्तवाडी पोलीस चौकी हे करत आहेत. खून प्रकरणांतील आरोपींना पोलीसांनी तातडीने कारवाई करत तीन तासांत ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, पोलीस उप-आयुक्त पौर्णिमा गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त सुनील पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, पोलीस हवालदार कुंदन शिंदे, राजू जाधव, पोलीस अंमलदार विष्णु सुतार, पुरुषोत्तम गुन्ला, राहुल ओलेकर अक्षयकुमार वाबळे, शिवाजी क्षीरसागर, शरद राऊत, दयानंद तेलंगे पाटील, प्रमोद भोसले, अमित सुर्वे, भारत आस्मर तपास पथक कर्मचारी यांनी केली आहे.

21 10 2021 News 1
Download

Latest Articles

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 17, 2025
प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

June 17, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

चव्हाणनगर कमान येथे युवकांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

June 17, 2025
“श्रमण संघ रत्न” पुरस्कार व “विद्यार्थी गुणगौरव” सोहळा पुण्यात होणार साजरा

“श्रमण संघ रत्न” पुरस्कार व “विद्यार्थी गुणगौरव” सोहळा पुण्यात होणार साजरा

June 17, 2025
Load More
Previous Post

मद्यप्राशन करतानाच्या वादात मित्रानेच केला मित्राचा खून

Next Post

दहशत पसरविणाऱ्या अट्टल गुन्हेगाराची एम.पी.डी.ए. कायदयान्वये स्थानबद्धता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recent News

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025
प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

June 17, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

चव्हाणनगर कमान येथे युवकांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

June 17, 2025
कार पार्किंगच्या वादातून तरुणाच्या डोक्यात पंप मारून गंभीर जखमी

मैत्रिणीची छेड काढल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून

June 16, 2025
ट्रॅफिक दंडाच्या नावाने एपीके फाईल पाठवून फसवणूक

ट्रॅफिक दंडाच्या नावाने एपीके फाईल पाठवून फसवणूक

June 16, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

पुण्यातील पोलीसांवर हल्ला करणारे आरोपी सोलापूर पोलीसांनी पकडले

August 26, 2024
सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

सराईत दोन गुन्हेगाराना पिस्तुलासह पकडले

August 10, 2024
बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

बार्शीत अपहरणाची सावट : दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

June 4, 2025
गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

गंगाधाम चौकात ट्रकने महिलेला चिरडले

June 12, 2024
तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

तीन चाकी सायकल दुकानाचे ९१ दिव्यांग व्यक्तींना वाटप

June 14, 2024
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.19 PM 2

वाहन चोरी करणाऱ्या दोन इसमांना दरोडा विरोधी पथकाकडुन अटक !

0
20210708 135837 0000

रेझिंग डे सप्ताहानिमित्त लष्कर पोलीस स्टेशन येथील बालस्नेही कक्षाचे उद्घाटन

0

सराईत गुंड पिस्टलसह जेरबंद

0
cropped 20210708 135837 0000 8

उस्मानाबाद पोलीसांच्या ताब्यातुन पळून गेलेला आरोपीस २४ तासाच्या आत जेलबंद

0
WhatsApp Image 2021 07 08 at 2.43.13 PM 1

कात्रज चौकामध्ये आंमली पदार्थ केले जप्त

0
विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 17, 2025
प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

June 17, 2025
धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

चव्हाणनगर कमान येथे युवकांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

June 17, 2025
“श्रमण संघ रत्न” पुरस्कार व “विद्यार्थी गुणगौरव” सोहळा पुण्यात होणार साजरा

“श्रमण संघ रत्न” पुरस्कार व “विद्यार्थी गुणगौरव” सोहळा पुण्यात होणार साजरा

June 17, 2025

Editor Information

Maharashtra News Network

अभिजीत डुंगरवाल

अभिजीत डुंगरवाल हे महाराष्ट्र जैन वार्ता व महाराष्ट्र न्युज नेटवर्क चे संपादक आहेत. त्यांनी लोकमत, पुढारी मध्ये पत्रकारितेचे काम करून नंतर स्वतःचे महाराष्ट्र जैन वार्ता नावाने मासिक ऑगस्ट 2015 मध्ये चालू केले व महाराष्ट्र न्युज नेटवर्क नावाने साप्तहिक २०२३ मध्ये चालू केले. आज ते दोन्ही साप्ताहिक महाराष्ट्रातील लोकप्रिय साप्ताहिक म्हणून ओळखले जात आहे.

Contact Number :

+91 – 9923133815

ABOUT US

MAHARASHTRA JAIN WARTA

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMUL/2016/67570

TITLE CODE:MAHMUL/03377

 

MAHARASHTRA NEWS NETWORK

WEEKLY NEWS PAPER

RNI NO:MAHMAR/2023/88387

TITLE CODE:MAHMAR/52531

Address:

Maharashtra Jain Warta/Maharashtra News Network

Tulsi Apartment, Office No 301, Near Mahavir Park, Kondhwa (B),Pune 411048 .Maharashtra 

Browse by Category

Recent News

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

June 17, 2025

HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ

June 17, 2025

Maharshtra Jain Warta Updates

Maharashtra News Network Updates

No Result
View All Result
  • महाराष्ट्र जैन वार्ता
  • महाराष्ट्र न्युज नेटवर्क

© 2024 Maharashtra Jain Warta