आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दुकानात चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरणारे तिघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 9, 2021
Spread the love

हडपसर पोलिसांची कारवाई : डीपी रोड विद्याविहार कॉलनी येथे झाली होती चोरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हडपसरमधील डीपी रोडवरील दुकानात चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरणाऱ्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी (दि. ७ नोव्हेंबर) सकाळी पावणेसातच्या सुमारास विद्याविहार कॉलनी येथे घडली होती.

किरण कालिदास कदम (वय २५, रा. पापडे गल्ली, सिद्धीविनायक कॉलनी, फुरसुंगी, पुणे), सौरव संजय अडागळे (वय १८, रा. ससाणेनगर, हडपसर, पुणे), महेश शिवाजी माने (वय १८, रा. केशवनगर-सोनाईनगर, जयमहाराष्ट्र चौक, मुंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून, एका फरीरा आरोपीचा पोलीस तपास करीत आहेत. चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रामजीवन पासवान (वय ३१, रा. हडपसर, पुणे) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, हडपसर पोलिसांना नियंत्रण कक्षातून डीपी रोड हडपसर येथील दुकानातून मोबाईल चोरीला गेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संशयावरून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केल्यानंतर त्याने इतर आरोपींची नावे सांगितली, त्यानुसार तिघांना अटक केली आहे. एका फरारी आरोपीचा तपास सुरू असल्याचे हडपसर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. पडसळकर यांनी सांगितले.