आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पीएमपीमध्ये चोरट्याने महिलेच्या हातातील मोबाईल नेला चोरून

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 21, 2021
Spread the love

बंडगार्डन पोलिसांत तक्रार : डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ जिल्हाधिकारी कार्यालय बस थांब्यावरील प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील जिल्हाधिकारी कार्यालय बसथांब्यावर पीएमपी बस थांबताच चोरट्याने महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (दि. १९ नोव्हेंबर २०२१) रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास घडली.

शंकर हनुमंत गायकवाड (वय ३५, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मंगळवार पेठेतील २१ वर्षीय महिलेने बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिला येरवडा- मंगळवार पेठ- गाडीतळ असा पीएमपी बसने प्रवास करीत होती. पुणे स्टेशनजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ बस थांबली, त्यावेळी बसमधून उतरताना आरोपीने हातातील दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून बसमधून उतरून पळून गेला. बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विनय जाधव करीत आहेत.