आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

अपघात स्मरण दिन साजरा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 22, 2021
Spread the love

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : रस्ते अपघातात जीव गमावलेल्या व्यक्तींचे स्मरण करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी अपघात स्मरण दिन साजरा करण्यात येतो. जाणीव फाऊंडेशन व पर्वती प्रतिष्ठानने हा उपक्रम सिटी प्राईड चौक येथे आयोजित केला होता.

या उपक्रमात नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग घेतला. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना गुलाबाची फुले देऊन सदिच्छा देण्यात आल्या. तर हेल्मेटचा वापर न करणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. चारचाकी वाहनांमध्ये लहान मुलांसाठी सुरक्षित सिटबेल्टचे प्रात्यक्षिक यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सादर केले.

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी नागरिकांना वाहतुकीचे नवे नियम सांगितले. याप्रसंगी संजीव भोर, शिवसेना जिल्हा प्रमुख रमेश बापू कोंडे, नगरसेविका अश्विनी कदम, ड्रायव्हिंगस्कूलचे राजू घटोळे, कवी लेखक गोपाळ कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप काळे, किरण साबळे, विनोद शिंदे, हर्षद गुजर, मंदार भालेराव, जयेश पटवा, रवींद्र गायकवाड, मंदार भालेराव, उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन जाणिव फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल काटे व पर्वती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल ननावरे यांनी केले.