आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

किरकोळ कारणावरून मारहाण करणारे चौघे जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 25, 2021
Spread the love

विमाननगर पोलिसांत गुन्हा : वडिलांनी मारहाण केल्याचा जाब विचारल्याने घडला प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : किरकोळ कारणावरून कोयत्याने मारहाण करणाऱ्या चौघांना विमाननगर पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना विमाननगरमधील एस.आर.ए. बिल्डिंग डी- पार्किंगच्या जागेत २२ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

सोहेल सलिम मुल्ला (वय २१), अमीन अश्रफ शेख (वय १८, रा. दोघे विमानगर, पुणे), सिद्धार्थ सुनील कांबळे (वय १९ रा. मंगळवार पेठ, पुणे) सिद्धार्थ संतोष रजपूत (वय १९, रा. बुधवार पेठ, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विनायक क्षीरसागर (वय २०, रा. विमाननगर, पुणे) यांनी विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीचे मित्र करण हेळेकर याला सोहेल याच्या वडिलांनी मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादीचा मित्र साईनाथ पाटोळे गेला, त्यावेळी त्यांच्यामध्ये वादावादी झाली. त्याचा मनात राग धरुन फिर्यादी व त्यांचे दोन मित्र फिरोज कुतुब खान आणि प्रतिक शिवाजी खंडागळे (रा. एस.आर.ए. बिल्डिंग, विमाननगर, पुणे) मोबाईलवर पब्जी खेळत होते. त्यांनी अचानक येऊन फिर्यादी व त्यांच्या मित्रांना मारहाण करीत कोयत्यासारख्या हत्याराने वार करून जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. ए. जाधव करीत आहेत.