आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अक्कलकोटमध्ये चंदन चोरांच्या मुसक्या आवळल्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • November 25, 2021
Spread the love

दोन लाख ३१ हजारांचा ऐवज जप्त : सोलापूर ग्रामीणच्या एलसीबीची कामगिरी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : हन्नूर (ता. अक्कलकोट) येथे चंदन तस्करांच्या सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून दोन लाख ३१ हजार ८०० रुपये किमतीची चंदनाची लाकडे व मोटारसायकल असा ऐवज जप्त केला.

विजय शिवाजी फसके, (वय ४०) गणेश शिवाजी घोडके (वय ३५) दोघे (रा. मालेगांव ता. बार्शी जि. सोलापूर) आणि नितिन उर्फ बुबा राऊत (रा. सर्जापूर ता. बार्शी जि. सोलापूर), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपींवर अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे गुरंन 536/2021 भादविसंक 379, 34 प्रमाणे व भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 42 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सोलापूर ग्रामीणच्या गुन्हे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना चंदनाची लाकडे व तोडण्यासाठी साहित्य घेऊन दोन व्यक्ती मोटारसायकलवरून हन्नूर (ता. अक्कलकोट) मार्गे इटकळकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता पोत्यामध्ये सुगंधी चंदनाची लाकडे व लाकडे तोडण्यासाठीचे सहा दांडगे, ४ नग लोखंडी गिरमिट, एक लोखंडी कुदळ, एक लोखंडी वाकर्स, एक धार लावण्याकरिताचा दगड, एक करवत, दोन लोखंडी कुऱ्हाडीचे पाते, एक मोटारसायकल असा एकूण दोन लाख ३१ हजार ८०० रुपयांचा ऐवज मिळवून आला. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास शैलेश खेडकर करीत आहेत.

सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर, सहायक फौजदार ख्वाजा मुजावर, पोलीस अंमलदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावले, समीर शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

get_footer();