आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पुण्यातील सराईत एक वर्षासाठी औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध !

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 4, 2021
Spread the love

स्वारगेटमधील अट्टल गुन्हेगार – पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडून कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत पसरवणाऱ्या अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए कायद्यानुसार एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील एक वर्षामध्ये तब्बल 47 जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गुन्हेगारांवर मोक्का तडीपार आणि स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे.

सराईत गुन्हेगार रविंद्र उर्फ बल्ली वसंत कांबळे (वय ३०, रा. डायस प्लॉट, गुलटकेडी) असे स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. कांबळे याला एमपीडीए कायद्यान्वये औरंगाबाद कारागृहात एक वर्षाकरीता स्थानबद्ध करण्यात आले आहे.

बल्ली कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याने त्याच्या साथीदारांसह स्वारगेट, खडक, विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या परिसरात कोयता, लाकडी बांबू यासारख्या हत्यारांसह फिरत असताना खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दुखापत यासारखे गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 5 गंभीर गुन्हे स्वारगेट पोलीस ठाण्यात दाखल आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी आरोपी कांबळे याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्तांना सादर केला होता.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन गुन्हेगारावर एमपीडीए ॲक्ट अंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांनी मागील एक वर्षात 47 जणांवर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांवर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.