आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पीएमपी बस आदळल्याने प्रवाशाच्या मणक्यात गॅप

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 6, 2021
Spread the love

कात्रज सर्पोद्यानसमोर घडला प्रकार : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये बस चालकाविरुद्ध गुन्हा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : भरधाव वेगात जाणारी पीएमपी बस जोरात आदळल्याने बसमधील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मणक्यात गॅप पडल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. यानंतर या प्रवाशाने थेट भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात धाव घेत पीएमपी बस चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली. ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अस्लम कादर शेख असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या बस चालकाचे नाव आहे. या प्रकरणी राजु मोतीराम चिंचवडकर (वय-62 रा. सच्चाईमाता मंदिर, आंबेगाव खु.) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कात्रज येथील सर्प उद्यानासमोर २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू चिंचवडकर हे 27 नोव्हेंबर रोजी लोहगाव ते कात्रज बसमधून प्रवास करत होते. बस कात्रज येथील सर्पोद्यानासमोर आली असता चालकाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करत बस भरधाव वेगात चालवली. चालकाने समोर गतिरोधक असताना देखील ब्रेक न लावता तशीच बस नेली. यामुळे बस जोरात आदळली आणि फिर्यादी यांच्या मणक्यात गॅप पडला. या घटनेला चालक अस्लम शेख हा जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.