आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पत्नीच्या त्रासाला कंटाळून 32 वर्षीय तरूणाची आत्महत्या

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 7, 2021
Spread the love

लोणी काळभोर परिसरातील घटना : पत्नी बांधकाम व्यावसायिकाकडे साईट दाखविण्याचे करते काम

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आतापर्यंत पती किंवा सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या अशा बातम्या वाचण्यात येत होत्या. मात्र, आता उलट प्रकार घडू लागले आहेत. पत्नीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

महावीर उत्तम जगदाळे (वय ३२, रा. उरळी कांचन) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचे वडिल उत्तम जगदाळे (वय ५८, रा. करमाळा) यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी तरुणाच्या पत्नीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, महावीर जगदाळे यांचे ७ ते ८ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. तो मिळेल तेथे मोलमजुरी करीत असे. त्याची पत्नी एका बांधकाम व्यावसायिकाकडे साईट दाखविण्याचे काम करते. लॉकडाऊनच्या काळात काम नसल्याने महावीर हा काही महिने गावाला गेला होता. तेथून परत आल्यानंतरही तो काही काम करीत नसल्याने पती पत्नीत भांडणे होत होती. ही बाब त्याच्या पत्नीने आपल्या सासर्‍यांना सांगून त्यांना पुण्याला बोलावून घेतले होते. त्यांनी येऊन समजून सांगितले होते. त्यानंतर ८ दिवसांनी ८ नोव्हेंबर रात्री महावीर याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे तपास करीत आहेत.