आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बर्थडे पार्टीमध्ये तरुणीवर बलात्कार करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 8, 2021
Spread the love

सहकारनगर पोलिसांत गुन्हा दाखल : तळजाई जंगल परिसरातील प्रकार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावून तरुणीला तळजाईच्या जंगलात नेले. तेथे दारु पिल्यानंतर तरुणीवर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

शुभम सीताराम शिंदे (वय १९, रा. सह्याद्रीनगर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी कात्रज येथील एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी शुभम याने फिर्यादी तरुणीला ५ डिसेंबर रोजी वाढदिवसाची पार्टी आहे, तू तळजाई शेवटचा बसस्टॉप येथे ये असे सांगितले. त्याप्रमाणे ती आली असताना आरोपीने त्याचा त्याच्या मित्रासह फिर्यादी यांना सायंकाळी ५ वाजता तळजाई येथील जंगलात नेले. तेथे ते दोन अडीच तास दारु पित बसले होते. फिर्यादी तरुणीला थंडी जाणवल्यानं तिला तिथंच कडेला झोपवलं. आणि शुभम याने तिच्यावर बलात्कार केला. या घटनेची माहिती तिने सहकारनगर पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी शुभम याला अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देसाई तपास करीत आहेत.