आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तरूणीला गुंगीचे औषध देऊन सलग 4 दिवस लैंगिक अत्याचार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 8, 2021
Spread the love

केशवनगर परिसरातील घटना : मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : मित्राने तरुणीच्या घरी येऊन तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तब्बल चार दिवस तिच्यावर अत्याचार केला. त्यातून ती गर्भवती राहिल्यावर लग्नास नकार दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार २ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान घडला.

नदीम बाबु शेख (वय ३२, रा. मुंबई) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुंढवा येथील केशवनगरमध्ये राहणार्‍या एका २७ वर्षाच्या तरुणीने मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा फिर्यादीचा मित्र आहे. सप्टेंबरमध्ये आरोपी फिर्यादीच्या घरी आला होता. त्याने गुंगीचे औषध देऊन ती बेशुद्ध झाली असताना तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकारानंतर त्याने तिला लग्नाचे आमिष दाखविले. १० ऑक्टोबर रोजी तो पुन्हा तिच्या घरी आला.
त्याने १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर वारंवार शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली. हे समजल्यावर त्याने तिला शिवीगाळ करुन लग्न न करण्याची धमकी दिली. तेव्हा तिने पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दिली आहे.