आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

मनाविरुद्ध पीएच.डी. करते म्हणून पत्नीचा छळ करणाऱ्याविरूध्द गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 9, 2021
Spread the love

विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा : वांजोटी असे बोलून मानसिक व शारिरीक त्रास

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : विरोध असतानाही पीएच.डी. करते, तसेच मुल होत नाही, म्हणून पत्नीला मारहाण करुन उपाशी ठेवून छळ केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पती विरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पीडित पत्नीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 37 वर्षीय पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, पतीचा पत्नीने पीएच.डी. करण्यास विरोध होता. असे असतानाही तिने मनाविरुद्ध पीएच.डी. करत आहे. तसेच फिर्यादी यांना मुल होत नाही, म्हणून सतत वांजोटी असे बोलून मानसिक व शारिरीक त्रास दिला. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात कौटुंबिक हिंसाचाराबाबत खटला दाखल केला. फिर्यादीस धमकी, मारहाण तसेच उपाशी ठेवून त्रास दिला. या छळाला कंटाळून शेवटी त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून सहायक पोलीस निरीक्षक निरगुडकर तपास करीत आहेत.