आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

वाहतूक पोलिसाने चालकाला शिवीगाळ करत बसची काच फोडली

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 9, 2021
Spread the love

मालधक्का चौकात घडला प्रकार : बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पुण्यात वाहतूक पोलिसांनी शिवनेरी बसच्या चालकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत बसची काच फोडल्याची घटना समोर आली आहे. पुणे स्टेशन येथील मालधक्का चौकात शिवनेरी बस वळवताना चालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये हा वाद झाला.

वाहतूक पोलिसांनी चालकासोबत वाद सुरु असतानाच बसची काच फोडली. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान चालकाने याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

शिवनेरी बसवरील चालक बाळकृष्ण फुलसुंदर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि. ८ डिसेंबर) संध्याकाळी ६ ते ६.३० च्या दरम्यान पुणे स्टेशन एसटी आगार येथून दादर शिवनेरी बस मालधक्का चौकाकडे घेऊन जात होतो. त्यावेळी तेथील चौकातील वाहतूक पोलीस कर्मचार्‍याला अनेक वेळा विनंती केली की, गाडी थोडी वळवून घेऊ द्या. पण ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी गाडी वळवून घेत असताना त्यांनी गाडीचा वायपर तोडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर काचेवर दगड मारला आहे. यामुळे मोठं नुकसान झालं आहे. मी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार केली असून, याबाबत चौकशी करून संबधित पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.