आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चाकूने वार करून जबरी चोरी करणाऱ्यास केले जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 9, 2021
Spread the love

युनिट-६ची कारवाई : केसनंद रोड (वाघोली) येथील एपिक सोसायटीत घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : आईवर उपचार करण्यासाठी सोसायटीतील महिलेकडून पिण्याचे पाणी मागण्याचा बहाणा करून चाकूने वार करीत चोरी करणाऱ्यास जेरबंद केले. गुन्हे शाखेच्या युनिट-६च्या पथकाने केसनंद रोड (वाघोली) येथील एपिक सोसायटीमध्ये ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की, युनिट-६चे पथक गस्त घालत होते. त्यावेळी केसनंद रोड (वाघोली, ता. हवेली) येथील एपिक सोसायटीमध्ये घरात घुसून महिलेवर चाकूने वार करून पळून जात असताना नागरिकांनी पकडल्याची माहिती मिळाली. त्यानुसार युनिट-६च्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. आईच्या उपचारासाठी सोसायटीमधील महिलेकडे पिण्याचे पाणी मागण्याचा बहाणा करून चाकूने वार करून चोरी केल्याची कबुली दिली. जखमी महिलेवर डिग्निटी-९ हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून, तिने लोणीकंद पोलीस स्टेसनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपासासाठी लोणीकंद पोलिसांच्या ताब्यात दिले.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस सहायुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट-६चे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, विट्ठल खेडकर, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.