आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

कटरने वार करुन खूनाचा प्रयत्न करणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 10, 2021
Spread the love

पुणे स्टेशन समोरील घटना : दारू पिण्यास पैसे न दिल्याने केला कटरने वार

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दारु पिण्यास पैसे देण्यास नकार दिल्याने एकाने तरुणावर कटरने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना पुणे रेल्वे स्टेशनसमोरील स्टेशन चौकात बुधवारी रात्री पावणेआठ वाजता घडली.

शाम नागोराव बनसोडे (वय ३२, रा. खडकपुरा गल्ली, गंगाखेड, परभणी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अनिल भगवान अस्मर (वय ३४, रा. पाटे खैरमळा, नारायणगाव, सध्या फिरस्ता) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सूर्यकांत माने यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, अनिल अस्मर हे स्टेशन चौकात थांबले असताना शाम बनसोडे याने त्याच्याकडे दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यात शाम याने अनिल याच्यावर धारदार कटरने वार करुन त्यांना गंभीर जखमी केले. कटरनेवार करणाऱ्यास अटक केली असून, बंडगार्डन पोलीस पुढील तपास करीत आहेत.