आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बनावट कागदपत्रांद्वारे पतसंस्थेला १२.७५ लाखांला फसविले

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 11, 2021
Spread the love

दत्तवाडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद : आयसीआयसीआय बँकेत बनावट खातेही काढले

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बनावट कागदपत्राद्वारे गाडी घेतल्याचे दाखवून कर्ज घेऊन पतसंस्थेला १२ लाख ७२ हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी राजेंद्र विश्वास कांबळे (वय ४६, रा. सिंहगड रोड) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विक्रम माधवराव इंगळे (रा. मंजुळा निवास, वारजे) व इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, राजेंद्र कांबळे हे सिंहगड रोडवरील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेत नोकरीला आहेत. विक्रम इंगळे व इतरांनी महिंद्रा चारचाकी गाडी सह्याद्री मोटार येथून खरेदी करण्यासाठी कर्ज मागणी अर्ज केला होता. त्यासाठी सह्याद्री मोटर्सचे इनव्हाईस, फी रिसीट, सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इत्यादी बनावट कागदपत्रे तयार केली. त्याद्वारे पतसंस्थेची दिभाभुल करुन आयसीआयसीआय बँकेत बनावट खाते काढले. त्या खात्यावर पतसंस्थेने काढलेला धनादेश स्वीकारुन १२ लाख ७२ हजार ४४५ रुपयांची फसवणूक केली.

हा प्रकार २० जून ते ७ ऑगस्ट २०२० दरम्यान घडला. हप्ते न भरल्याने पतसंस्थेने चौकशी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या युनिट-३चे पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करीत आहेत.