लष्कर पोलीस स्टेशनची कारवाई : लष्करमधील बिशप स्कूलशेजारी केली कारवाई
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : शानू शफिक शेख (वय १९, पथरी, रामनगर, रामटेकडी, हडपसर, पुणे), आर्शद आयुब पठाण (वय २५, अंध शाळेसमोर, रामटेकडी, हडपसर, पुणे), रिहान नझीर अहमद शेख (वय २५, सवेरा पार्क, कोंढवा, पुणे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
याप्रकरणी सद्याम असिमुददीन हुसेन (वय २३, रा. भंडारशाह मशिदजवळ, चुंडामन ताडीम, भवानी पेठ, पुणे) यांनी लष्कर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती.
पोलिसांनी सांगितले की, कॅम्पमधील एम. जी. रोडवरील सारेगमा दुकानासमोर फुटपाथवर कपडे विक्री करीत असताना शानू शेख व त्याचेबरोबर चार अनोळखी इसमानी संगनमताने फिर्यादीला फुटपाथवर धंदा लावण्यासाठी हप्ता मागणारे कॅम्पमधील बिशप स्कुलशेजारी, पडीक बंगल्याजवळ थांबल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे रोख रुपये ३२५० मिळून आले. पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त यशवंत गवारी, लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम, पोलीस निरीक्षक कविदास जांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक शिळमकर, पोलीस उपनिरीक्षक राऊत, पोलीस हवालदार कदम, पोलीस नाईक कोळी, नदाफ, मेंगे, मांजरे, भोसले यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
