आवृत्ती पुणे
← Back to Homepage

अवैध सावकारी करणाऱ्यांवर १८ गुन्हे दाखल

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 12, 2021
Spread the love

पोलीस आयुक्तांचे आदेश : परिमंडल आणि गुन्हे शाखेची कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : शहरामध्ये अवैध सावकारी करून पैसे वसूल करण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. अवैध सावकारीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार खास पथके तयार केली.

विशेष पथकाने १ जानेवारी २०२१ पासून आजपर्यंत सावकारी कायदा कलम ३९, ४५ व भादवि कलम ४५२ अन्वये परिमंडल-२- ०२, परिमंडल-३- ०२, परिमंडल-०४-१, परिमंडल-५- ४ आणि गुन्हे शाखेकडून ९ असे एकूण १८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अवैध सावकारी करून पैसे वसूल करीत असेल किंवा सावकारीबाबत कोणत्याही प्रकारचा त्रास देत असेल तर त्यांनी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या कार्यालयातील ९१४५००३१०० या मोबाईल क्रमांकावर किंवा याच मोबाईल क्रमांकावरील व्हॉट्सअॅपद्वारे संपर्क साधावा, असे पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.