आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

एसआरपीएफ जामखेड ग्रुप भरतीच्या परीक्षेत मुन्नाभाईचा प्लान फसला

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 13, 2021
Spread the love

कोथरूडमधील मोरे विद्यालयातील प्रकार : औरंगाबादच्या कॉपीबहाद्दरावर कारवाई

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : एसआरपीएफ जामखेड ग्रुप भरतीची लेखी परीक्षा (रविवार, दि. १३ डिसेंबर २०२१) पुण्यात झाली. पोलीस भरतीची परीक्षा सुरळीत व्हावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भरारी पथके कार्यरत होती. पोलिसांच्या सतर्कतेमुळे एकाला मोबाईलचा वापर करुन कॉपी करताना रंगेहात पकडले. हा प्रकार कोथरुड येथील शंकरराव मोरे विद्यालयातील परीक्षा केंद्रावर उघडकीस आला.

केतन विठ्ठल लखवाड (वय 24, रा. मंबापूरवाडी, ता खुलताबाद, जि औरंगाबाद) असे कॉपी करताना रंगेहात पकडलेल्या परीक्षार्थीचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, एसआरपीएफ जामखेड ग्रुप भरतीची लेखी परीक्षा शंकरराव मोरे विद्यालय कोथरूड या ठिकाणी होती. या परीक्षेमध्ये परीक्षार्थी केतन लखवाड हा परीक्षा चालू असताना मोबाइलचा वापर करून कॉपी करण्याचा प्रयत्न करीत असताना आढळून आला. त्याला रंगेहात पकडून त्याच्यावर कोथरूड पोलीस ठाण्यात महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनिर्दिष्ट परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 कलम 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल पवार आणि कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र जगताप
यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास कोथरूड पोलिस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.