आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सेल्समनचे लक्ष विचलित करून मंगळसूत्र चोरणारा जेरबंद

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 13, 2021
Spread the love

समर्थ पोलिसांची कामगिरी : उत्पन्नाचे साधन नसल्याने बनला जोर

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लॉकडाऊनमध्ये उत्पन्नाचे साधन नसल्याने पत्नीच्या मदतीने सोनाराच्या दुकानात सेल्समनचे लक्ष विचलित करून सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या जीम ट्रेनरला पोलिसांनी जेरबंद केले. त्याच्याकडून एक लाख १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त केले आहे.

बाळासाहेब प्रदीपकुमार हांडे (वय ३५, रा. ॲटगेम स्काय वर्ल्ड, होलेवस्ती चौक, उंड्री, पुणे, मूळ- अंबिका भुवन, वाडी भातवाडा, कुनकुवा, वडोदरा, गुजरात) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, रास्ता पेठेतील परमार ज्वेलर्समध्ये राहुल राजेश गायकवाड (वय २३, रा. देशमुखवस्ती, कॅनॉल साईड, शिवणे, पुणे) यांना दागिणे खरेदी करण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून एक लाख बारा हजार रुपये किमतीचे २२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरून नेले. याप्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता.

समर्थ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक विश्लेषण करून गुन्ह्यातील मोपेडचा शोध घेतला. त्यानुसार निशा परदेशी यांच्या नावावर मोपेड असल्याचे आढळून आले. त्यानुसार मोपेडसह जीम ट्रेनर बाळासाहेब प्रदीपकुमार हांडे (वय ३५, रा. ॲटगेम स्काय वर्ल्ड, होलेवस्ती चौक, उंड्री, पुणे, मूळ- अंबिका भुवन, वाडी भातवाडा, कुनकुवा, वडोदरा, गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. लॉकडाऊनमध्ये उत्पन्नाचे साधन नसल्याने पत्नी निशाच्या मदतीने सोनाराच्या दुकानात जाऊन मंगळसूत्र विकत घेण्याच्या बहाण्याने सेल्समनचे लक्ष विचलित करून एक लाख १२ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी मंगळसूत्र जप्त केले असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत.

पोलीस उपायुक्त प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतिष गोवेकर, फरासखाना पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, समर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक संदीप जोरे, पोलीस हवालदार सुशील लोणकर, संतोष काळे, सुभाष पिंगळे, पोलीस शिपाई महेश जाधव, निलेश साबळे, हेमंत पेरणे, शुभम देसाई श्याम सूर्यवंशी, सुभाष मोरे, विठ्ठल चोरमले, समीर आवळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.