आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

लोणी काळभोरमधील एमआयटी कॉलेजच्या फ्रेशर्स पार्टीत राडा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 14, 2021
Spread the love

लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : सीनिअर कडून ज्युनिअर्संना मारहाण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी कॉलेजसमोर सीनिअर आणि ज्युनिअरमध्ये तुफान राडा झाला. फ्रेशर्स पार्टीत झालेल्या वादातून काही सीनिअर विद्यार्थ्यांनी दोन ज्युनिअर विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली आहे. सीनिअर्स विद्यार्थ्यांनी ज्युनिअर विद्यार्थ्यांना कडं आणि विटांनी मारहाण करुन जखमी केलं. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील प्रसिद्ध एमआयटी इंजिनिअरिंग कॉलेज आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 10 डिसेंबर रोजी पुण्यातील एका हॉटेलमध्ये कॉलेजच्या फ्रेशर्ससाठी वेलकम पार्टी आयोजित करण्यात आली होती. यावेळी बारा विद्यार्थी आणि दोन तक्रारदार विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणातून खुन्नस दिल्याने दोन गटात बाचाबाची झाली. त्यावेळी त्या ठिकाणी असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद मिटला होता.

मात्र, आरोपींनी मनात राग धरुन घटनेच्या दिवशीच शुक्रवारी (दि.10) दुपारी साडेचार ते साडेसहाच्या सुमारास संबंधित दोन ज्युनिअर तरुणांना गाठून मारहाण केली. आरोपींनी हातातील कडं आणि विटांनी मारहाण करत ज्युनिअर्संना जखमी केले. जखमी तरुण इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहेत. या घटनेनंतर जखमी तरुणांनी शनिवारी (दि.11) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात 12 जणांविरुद्ध फिर्याद दिली. जखमी तरुणांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.