आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

सात लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यावर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 14, 2021
Spread the love

हडपसर पोलिसांत फिर्याद : बीएसएनएलमधून बोलत असल्याचे सांगून घातला गंडा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : बीएसएनएल कंपनीतून बोलत असल्याचे सांगून ऑनलाइन ट्रान्झॅक्शन करीत सात लाख रुपयांची फसवणूक केली. ऑनलाइन माध्यमाद्वारे फसवणूक करणाऱ्या अज्ञातावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.

तपनकुमार विजयचंद्र गांगुली (वय ७२, रा. प्लॅट नं. बी-७०२, नंदिनी सोसायटी, सोलापूर रोड, मांजरी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीला मोबाईलवर अनोळखी मोबाईलधारकाने फोन करून बीएसएनएल कंपनीतून बोलत आहे. तुमचे मोबाईल क्रमांकाचे केवायसी अपडेट करावयाचे आहे, त्यासाठी मोबाईल लिंक पाठवून १० रुपये पाठविण्यास सांगितले. त्याआधारे बँक खात्यातून ऑनलाइन पद्धतीने माहिती घेत दोन एफडीवर कर्ज घेऊन ऑनलाइन पद्धतीने सात लाख ८ हजार २०६ रुपये परस्पर काढून घेऊन फसवणूक केली. हडपसर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे पुढील तपास करीत आहेत.