आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

व्हीडिओ कॉलवर नग्न होण्यास सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 14, 2021
Spread the love

लोणीकंद पोलिसांनी दोघांना केली अटक : स्क्रीन शॉट, विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : तरुणाने एका 16 वर्षाच्या मुलीला व्हिडिओ कॉल करुन तिला जबरदस्तीने कपडे काढण्यास सांगितले. तिचे नग्न अवस्थेतील स्क्रिन शार्ट असलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार कोलवडी (ता. हवेली) येथील नारळाची बाग तसेच घोरपडी येथे जुलै २०२१, २९ नोव्हेंबर आणि ६ डिसेंबर रोजी घडला आहे.

आयान अश्यापक खान (वय 19) आणि नवनाथ संभाजी गिरी (वय 19, रा. खराडी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका 16 वर्षाच्या युवतीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी सांगितले की, आयान खान याने फिर्यादीसोबत शारिरीक संबंध ठेवले. तिला जबरदस्तीने व्हिडिओ कॉल केला. त्यावर तिला कपडे काढण्यास सांगितले. त्या व्हिडिओ कॉलवरुन त्यांनी स्किन शार्ट काढले. हे तुझे नग्न अवस्थेतील स्क्रिन व्हायरल करेन, अशी धमकी दिली. नवनाथ गिरी याने २९ नोव्हेंबर आणि ६ डिसेंबर रोजी तिला घोरपडी येथे बोलावून तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर या युवतीने पोलिसांकडे फिर्याद दिल्यावर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. लोणीकंद पोलिस पुढील तपास करीत आहेत.