आवृत्ती पुणे
← Back to Homepage

म्हाडाच्या पेपर फुटीमध्ये आयुक्ताचा हात!

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 18, 2021
Spread the love

सायबर पोलिसांची कामगीरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्ताला अटक

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : सायबर पोलीस पुणे शहर येथे म्हाडा पेपर फुटी संदर्भात अटक केलेल्या आरोपी जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा संचालक प्रितीश देशमुख व त्याचे साथीदार एजंट संतोष हरकळ व अंकुश हरकळ यांचेकडे तपास चालू असताना त्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम नामदेव सुपे तसेच शिक्षण विभागात सल्लागार म्हणून काम करीत असलेला अभिषेक सावरीकर यांच्या मदतीने सन २०१९-२०२० मधील शिक्षक पात्रता परिक्षा (TET) मध्ये त्यांनी परिक्षार्थी कडून पैसे स्विकारुन परिक्षेच्या निकालात फेरफार करुन त्यांना पात्र केले होते. असा जबाब दिल्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

सायबर पोलीसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तथा अध्यक्ष तुकाराम नामदेव सुपे तसेच शिक्षण विभागात सल्लागार म्हणून काम करीत असलेला अभिषेक सावरीकर यांना चौकशीसाठी सायबर पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यांचेकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी सदरहून परीक्षा आयोजनाची जबाबदारी असलेल्या खाजगी कंत्राटी कंपनी जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक प्रितीश देशमुख याला हाताशी धरुन त्यांचेकडे संतोष हरकळ व अंकुश हरकळ, रा. सिंदखेडराजा बुलढाणा यांच्या मदतीने परिक्षेतील परिक्षार्थींची माहिती मिळवून त्या परिक्षार्थीना पात्र करण्याचे आमिष दाखवून त्यांचेकडून प्रत्येकी ५० हजार ते १ लाखापर्यंत रक्कमा स्विकारुन सुमारे ४ कोटी २० लाख रुपये जमा करुन ते आपसात वाटून घेतले. त्यामध्ये तुकाराम सुपे याने १.७० कोटी, प्रितेश देशमुख याने १.२५ कोटी तर अभिषेक सावरीकर यास १.२५ कोटी इतके पैसे घेतले असल्याचे कबूल केले आहे.

तपासामध्ये आरोपी नामदेव सुपे याचे घराची घरझडती घेतली असता त्याचे घरातून या परीक्षेच्या माध्यमातून गैरलाभाने प्राप्त संपत्ती पैकी ८८,४९,९८०/- रु रोख व या संपत्तीतून खरेदी केलेले ५ ग्रॅम सोन्याचे नाणे ०५ तोळयाचे दागिने व ५.५०,०००/- रुची एफ. डी केल्याची कागदपत्रे जप्त केली आहेत. त्याशिवाय त्याने त्याच्या मित्रास लाखो रुपये दिल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय या गुन्हयाचे तपासात यापूर्वी म्हाडा संबंधी गुन्हयात अटक आरोपीत नामे संतोष हरकळ याच्याकडे त्याचे बुलढाणा येथील घरझडतीत सन २०१९- २०२० मधील वरील गुन्हयातील निकालात फेरफार केलेल्या परीक्षार्थीची यादीची माहिती असलेला लॅपटॉप पथकाने जप्त केलेला आहे. त्याचे परीक्षण बाकी आहे.

सदर गुन्हयाचा तपास अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, डॉ. रविंद्र शिसवे, सह पोलीस आयुक्त, पुणे शहर, रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पुणे शहर भाग्यश्री नवटके, पोलीस उपआयुक्त आर्थिक व सायबर गुन्हे, विजय पळसुले, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे व.पो.नि. डी.एस. हाके यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कुमार घाडगे हे करीत आहेत. या गुन्हयातील तपासाच्या कामगिरी मध्ये सायबर पोलीस ठाण्यातील पोनि मिनल पाटील, पोनि अंकुश चिंतामण, पोनि संगिता माळी, पोउनि डफळ, वाघमारे, पडवळ, गवारी, पोलीस अंमलदार संदेश कर्णे, नितिन चांदणे, नवनाथ जाधव, सचिन वाजे, अनिल पुंडलीक, मानसी मोरे तसेच आर्थिक गुन्हे शाखेकडील पोनि शिवले, खेडेकर व कोळी यांनी बहुमोल मदत केलेली आहे.