ICJS मधील पोलीस सर्च या वर्गवारीमध्ये देशपातळीवरील पुरस्कार
महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क
पुणे : महाराष्ट्र राज्य पोलीसांनी CCTNS/ ICIS या प्रणालीचा उपयोग पोलीस दैनंदिन कामकाजात गुन्हे प्रकटीकरण, गुन्हे प्रतिबंधक कारवाई करणे, पासपोर्ट/चारित्र पडताळणी, वाहनाबाबतची पोलीस रेकॉर्डवरील माहितीची पडताळणी, गुन्हेगारांचा कार्यपध्दतीप्रमाणे शोध (एमओबी), शस्त्र परवाना इत्यादि प्रभावीपणे वापर केला. त्यासाठी Interoperable Criminal Justice System (ICJS) मधील पोलीस सर्च या वर्गवारीमध्ये देशपातळीवर दुसऱ्या क्रमांकाचे राज्य म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा गौरव करण्यात आला.
केंद्रीय गृह मंत्रालय (MHA) व राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र, (NCRB) नवी दिल्ली यांचे संयुक्त विदयमानाने “Good Practices in CCTNS / ICJS 2021” कॉन्फरन्स प्रमुख अतिथी अजयकुमार मिश्रा, केंद्रीय गृह राज्यमंत्री भारत सरकार यांचे उपस्थितीमध्ये पार पडली. सदर कॉन्फरन्समध्ये महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक आला. CCTNS/ICIS या प्रणालीच्या सहाय्याने राज्यातील १९९० गुन्हे उघडकीस आणले असून ६७० चोरीस गेलेल्या मालमत्तेचा शोध, १९५९ हरवलेल्या व बेवारस मयतांचा शोध १३,८४८ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई ७८६ प्रकरणामध्ये जामीन फेटाळले आहेत. या प्रणालीद्वारे २९.८०३ संशयीत इसम व आरोपींची पडताळणी करण्यात आली असून १६,६२४ इसमांविरुध्द गुन्हे नोंदी मिळून आल्या आहेत. पोलीसांकडे दाखल झालेल्या १,५९.९०३ पारपत्र व चारित्रय प्रकरणांची पडताळणी करण्यात आली असून ३७०९ इसमांवर गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न केले आहे. महाराष्ट्र राज्याने केलेल्या या उल्लेखनीय कामगीरीबददल देशपातळीवर दुसरा क्रमांक पटकाविला आहे.
त्याचप्रमाणे CCTNS / ICJS या प्रणाली राज्यामध्ये यशस्वीपणे राबविण्यासाठी उल्लेखनिय कामगिरी केल्याबददल अर्चना कदम, पोलीस उपनिरीक्षक, संदीप शिंदे, पोलीस नाईक व प्रियंका शितोळे, पोलीस नाईक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना वैयक्तीक उत्कृष्ट कामगिरीबाबत पारितोषीक देण्यात आले.
सदर कामगिरी रितेश कुमार, अपर पोलीस महासंचालक, मकरंद रानडे, विशेष पोलीस निरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मार्गदर्शनाखाली संभाजी कदम, पोलीस अधीक्षक, तांत्रिक सेवा, संगणक विभागातील नंदा पाराजे, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस उप अधीक्षक जितेंद्र कदम, चंद्रशेखर सावंत, अर्चना पाटील,अरविंद आल्हाट तसेच पोलीस निरीक्षक शशीकला काकरे, जीवन मोहिते यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे.
