आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

पत्नीला नांदवण्यास नकार देणाऱ्या पतीसह 5 जणांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 20, 2021
Spread the love

बंडगार्डन पोलिसांत फिर्याद : 40 लाख रुपये घेऊन देत होते त्रास

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : पत्नीच्या माहेरच्या लोकांकडून वेगवेगळी कारणे सांगून लाखो रुपये घेऊन पत्नीला नांदवण्यास नकार देणाऱ्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना डोंबिवली इस्ट येथे 2014 ते जुन 2020 या कालावधीत घडली आहे.

पती टोनी नारायण परमार (वय-34), नणंद रुपल मेहुल वाघेला, मेहुल वाघेला, सासु नर्मदा नारायण परमार, सासरे नारायण मंगलदास परमार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 34 वर्षीय पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.17) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे टोनी परमार याच्यासोबत 2014 मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर आरोपी पती आणि सासरच्या लोकांनी पीडित महिलेच्या आई-वडील आणि भावाला वेगवेगळी कारणे देऊन 35 ते 40 लाख रुपये घेतले. तसेच मुलाच्या आजरपणाची कारण सांगत पैसे घेतले. पैसे घेऊनही आरोपींनी महिलेला शिवीगाळ करुन मारहाण केली. सततच्या त्रासाला वैतागून पीडित महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास बंडगार्डन पोलीस करीत आहेत.