आवृत्ती पुणे
← Back to Homepage

बांधकामाच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 22, 2021
Spread the love

उरुळी देवाची : बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षिततेचा उपाय नसल्याने घडली दुर्दैवी घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : उरुळी देवाची (ता. हवेली, जि. पुणे) येथील जुना पालखी मार्ग येथे बांधकामाशेजारी हायटेन्शनच्या विद्युत प्रवाहाचा शॉक बसून खाली पडल्याने मजुराचा मृत्यू झाला. ही घटना १४ डिसेंबर रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली.

शुभम संचित परब (वय २१, रा. भाडळे यांचे बिल्डिंग, उरुळी देवाची, पालखी मार्ग, ता. हवेली, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सागर वणवे यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, उरुळी देवाची (ता. हवेली, जि. पुणे) येथील जुना पालखी मार्ग येथे हायटेन्शनच्या बाजूलाच भाडळे बिल्डिंगचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी हायटेन्शनच्या विद्युत प्रवाहाचा शॉक बसल्याने दुसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा मृत्यू झाला. बांधकाम व्यावसायिकाने कामगाराच्या सुरक्षेबाबत कोणतीही काळजी घेतली नाही, हलगर्जी व निष्काळजीपणामुळे मजुर दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर पुढील तपास करीत आहेत.