आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दारु पिण्यास अटकाव केल्याने बिअरची बाटली घातली डोक्यात

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 22, 2021
Spread the love

चतुःश्रृंगी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा : इथे दारू पिऊ नका सांगितल्याने घडली घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : वाटेत दारु पित बसलेल्यांना महिलेने इथे दारु पिऊ नका असे सांगितल्याने चौघा दारुड्यांनी महिलेबरोबर असलेल्या तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सौरभ संजय डोंगरे, अमित देवकर, रोहित देवकर व पवार (सर्व रा. महालेनगर, वडारवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सिद्धार्थ लक्ष्मण कट्टीमणी (वय २९, रा. सिता सदन, गोखलेनगर रोड) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांची मावशी हे महालेनगर येथे त्यांच्या भाडेकरुकडे भाडे मागण्यासाठी रविवारी रात्री साडेआठ वाजता गेले होते. तेथे मोकळ्या जागेत फिर्यादीच्या ओळखीचे चौघे जण दारु पित बसले होते.

फिर्यादीच्या मावशीने त्यांना इथे दारु पिऊ नका. भाडेकरु कसे येणार जाणार असे म्हणाल्या. यावरुन त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मावशीला शिवीगाळ केली. रोहित देवकर याने फिर्यादी यांच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक उकिर्डे अधिक तपास करीत आहेत.