आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बीडच्या पदाधिकाऱ्याला अटक, भाजपच्या गोटात खळबळ

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 22, 2021
Spread the love

राजकीय वर्तुळात रंगली चर्चा : आरोग्य विभाग पेपर फुटी प्रकरणाला नवे वळण

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : राज्यात परीक्षांचा नुसता गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यानंतर परीक्षा विभागाचे माजी आयुक्त सुखदेव डेरेसह तीन जणांना अटक केली.

याप्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली. तर दुसरीकडे आरोग्य विभागाच्या परीक्षेत पेपर फुटी प्रकरणाला नवंच वळण लागलं आहे. याप्रकरणी बीड जिल्ह्यात भाजपच्या युवा मोर्चाचा माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय सानप याला पोलिसांनी अटक केली. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्याला अटक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. पेपर फुटी प्रकरणामध्ये बीड जिल्ह्यात या आगोदरच कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. दरम्यान, मागील काही दिवसांपासून संजय सानप यांची पुण्यात सायबर पोलिसांकडून चौकशी चालू होती. त्यावेळी त्याचा या पेपरफुटी प्रकरणांमध्ये सहभाग असल्याचं निदर्शनास आले.

दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी सानप यांना तात्काळ ताब्यात घेतले आणि सानपला 23 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संजय सानप हा बीड जिल्ह्यातील वडझरी गावातील उपसरपंच आहे. तो बीड शहरात राहतो त्याचा मोठा बंगला आहे. संजय सानपच्या अटकेमुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असल्याचं दिसतं.