आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

बिअरची बाटली व कोयत्याने वार करणाऱ्यांवर गुन्हा

maharashtra jain warta • News Slider, Police, Previous Issue • December 22, 2021
Spread the love

ऑफिस-कारवर केली दगडफेक : कोथरूडमधील सुमा. श्रावणधारा सोसायटीतील घटना

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क

पुणे : दारू प्यायला का आला अशी विचारणा केल्याने चौघांनी बिअरची बाटली आणि कोयत्याने वार करीत मारहाण करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल केला. कोथरूडमधील सुमा. श्रावणधारा सोसायटीमध्ये २० डिसेंबर २०२१ रोजी रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली.

आदिनाथ तिडके (वय २३, रा. कोथरूड, पुणे) यांनी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी सुमा. श्रावणधारा सोसायटीच्या सी बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये फोनवर बोलत होते. त्यावेळी त्यांना भांडणाचा आवाज आल्याने ते तेथे गेले. त्यावेळी फिर्यादीच्या मित्राला मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ करत मारहाण करीत असल्याचे दिसून आले. तेव्हा फिर्यादीने म्हणाले तुम्ही येथे दारू प्यायला आला का, तेव्हा त्यांनी वाद घालून याचा विषयच संपवा असे म्हणत जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यावर, हातावर बिअरची बाटली मारून जखमी केले. त्याचवेळी दुसऱ्याने कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला, मात्र फिर्यादीने चलाखीने चुकवला. त्यानंतर रफिक शेख याचा विषयच संपवू असे म्हणून आरोपी सोसायटीच्या मोकळ्या जागेतील स्वीफ्ट कारवर दगड व कोयत्याने मारून, रफिकच्या ऑफिसवर दगडफेक करून निघून गेले. पुढील तपास कोथरूड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक पी. व्ही. कुलकर्णी करीत आहेत.